BJP Candidate Nitin Gadkari Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से"; भित्तीचित्र रंगवत गडकरींनी प्रचाराचा फोडला नारळ

BJP Candidate Nitin Gadkari: लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरमध्ये त्यांच्या प्रचाराची सुरूवात झाली आहे.

Rohini Gudaghe

Lok Sabha Election Public Campaign

लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी (BJP Candidate Nitin Gadkari) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोनवेळेला नागपूरमधून निवडणूक जिंकलेले नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. नागपूरमध्ये त्यांच्या प्रचाराची सुरूवात झाली आहे.  (latest politics news)

भाजपच्या प्रचाराने अजून जोर धरलेला नसला, तरी नितीन गडकरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रचार सुरू केला आहे. याच मालिकेत त्यांनी त्यांच्या घराच्या खाली भिंतीवर "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से" अशा आशयाचा भित्तीचित्र रंगवत एका प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला (Lok Sabha Election Public Campaign) आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१३ मार्च रोजी भाजपने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. भाजपने २० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले (Maharashtra Politics) आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.

नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन गडकरी नागपुरातील घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुबानं औक्षण केलं. नितीन गडकरी यांचा भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत समावेश (Nitin Gadkari Lok Sabha Election) आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाचं वातावरण तापलं आहे.

आज निवडणूकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिलं (Nagpur Politics) आहे. या पत्रात त्यांनी १० वर्षातील विकासकामांचा पाढा वाचत जनतेला नवी गॅरंटी दिली आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभा २०२४ निवडणूक तारीख आज जाहीर होणार (Maharashtra Politics)आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात बिबट्या पडला कोरड्या विहिरीत

Masala Sandwich Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, ऑफिसवरून आल्यावर १० मिनिटांत बनवा

Rava Burfi Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रवा बर्फी, नोट करा रेसिपी

Maharashtra Politics: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीचा सूर, सुधीर मुंगटीवारांसह सत्तेतील आमदार सरकारच्या कामावर नाखूश

Bollywood Actress: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत एक किंवा दोन नव्हे तर 4 पदव्या

SCROLL FOR NEXT