Mumbai Police Saam Tv
लोकसभा २०२४

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Mumbai Lok Sabha: देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवरी म्हणजेच 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी राज्यातील लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मुंबईच्या 6 जागांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 5th Phase:

>> संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवरी म्हणजेच 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी राज्यातील लोकसभेच्या 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मुंबईच्या 6 जागांचा समावेश आहे.

या जागांवर पार पडणार मतदान

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे.

दरम्यान, सोमवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. मतदानादिवशी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

दरम्यान, सोमवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत. मतदानादिवशी शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. यासाठी ५ अपर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २४७५ पोलीस अधिकारी व २२१०० पोलीस अंमलदार व ०३ दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात असतील.

यासोबतच अतिरिक्त मदतीकरीता १७० पोलीस अधिकारी व ५३६० पोलीस अंमलदार व ६२०० होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात असणार आहे. महत्वाच्या ठिकाणी ३६ केंद्रिय सुरक्षा दले (CAPF / SAP) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदानादरम्यान एकूण २७५२ पोलीस अधिकारी, २७४६० पोलीस अंमलदार, ६२०० होमगार्ड, ०३ दंगल काबु पथक (RCP), ३६ केंद्रिय सुरक्षा दले (CAPF / SAP) निवडणुक बंदोबस्तकामी तैनात असतील. यातच १६ मेपासून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्याकरीता एकूण ८०८८ लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने फौ.दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये दि. १५/०५/२०२४ रोजी मुंबई पोलिसांकडून आदेश प्रसारीत करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

Manoj Jarange Patil: कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा

GST Reforms: विम्यावरील जीएसटी रद्द, प्रिमियम होणार स्वस्त, तुमचे पैसे किती वाचणार?

SCROLL FOR NEXT