Oshiwara Polling Booth Saam Tv
लोकसभा २०२४

Mumbai Loksabha Voting: ओशिवरामध्ये भाजप-ठाकरे गट आमनेसामने, मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप

Oshiwara Polling Booth: आमदार भारती लवेकर (MLA Bharati Lavekar) आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले (Divya Dhole) हे मतदारांशी संवाद साधत त्यांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईतल्या ओशिवरामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे (BJP Vs Thackeray Group) कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. याठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आमदार भारती लवेकर (MLA Bharati Lavekar) आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले (Divya Dhole) हे मतदारांशी संवाद साधत त्यांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि भारती लवेकर, दिव्या ढोले यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू होते. या मतदान केंद्रामध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार भारती लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले फिरत होत्या. या दोघी याठिकाणी आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. या मतदारसंघात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमदार भारती लवेकर मतदान करण्यासाठी ओशिवरा येथील मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. भारती लवेकर यांचे या ठिकाणी मतदान नसताना देखील त्या या मतदान केंद्रावर फिरत होत्या आणि मतदारांशी संवाद साधत होत्या. त्यामुळे स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमदार भारतीय लवेकर आणि दिव्या ढोले यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला. या दोघी देखील गेल्या तासाभरापासून मतदारांना कन्व्हेंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या सर्व गोंधळानंतर या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून दिव्या ढोले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : एखाद्याचं हृदय जिंकायचंय? वाचा चाणक्यांची ही 4 गुपितं

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT