Mumbai News: कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Kandivali News Today : कांदिवली परिसरातील एका फ्लॅटमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. प्रमोद चोणकर (वय ६१) आणि अर्पिता चोणकर (वय ५७) अशी मृतांची नावे आहेत.
कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ
Kandivali Husband wife Death News Saam TV

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवली परिसरातील एका फ्लॅटमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. प्रमोद चोणकर (वय ६१) आणि अर्पिता चोणकर (वय ५७) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. प्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ
Mumbai News: मुंबई हादरली! कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ५० वर्षीय आरोपीला अटक

पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, प्रमोद यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर अर्पिता या बेडवर मृतावस्थेत आढळून आल्या. दोघांनीही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुहेरी आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही.

मात्र, आर्थिक विवंचनेमुळे मानसिक नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात वृद्ध जोडप्याने स्वत:च्या इच्छेने आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.

मृत प्रमोद वासुदेव चोणकर आणि अर्पिता प्रमोद चोणकर हे कांदिवलीच्या अनुभूती सोसायटीच्या आर्य चाणक्य नगरमध्ये राहत होते. मूलबाळ नसल्याने दोघेही एकाकी जीवन जगत होते.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रमोद आणि त्यांच्या पत्नी सोसायटीतील रहिवाशांना दिसले नाहीत. गुरुवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने अनेकांना संशय आला. त्यांनी याची माहिती समतानगर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पोलीस घटनास्थळी पोहोचले.

दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर प्रमोद यांनी नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले, तर त्याच्या शेजारी पत्नी अर्पिता मृतावस्थेत पडल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ
Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com