सचिन गाड, साम टीव्ही मुंबई
ऐन निवडणुकीत ईशान्य मुंबईत भाजपला मोठा झटका बसला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. धार्मिक कार्यक्रमात भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा मतदान करण्याचं आवाहन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय.
ईशान्य मुंबईतील जनता नगर, मंडाळा, मानखुर्द येथे उत्तर भारतीय स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तर भारतीय स्नेह मिलन कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन (Mumbai Lok Sabha) करण्यात आलं होतं. यामुळे आयोजक सुनिल पाल यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची परवानगी (Lok Sabha 2024) नसल्याचं देखील निष्पन्न झालं आहे. आयोजक सुनिल पाल यांच्यावर मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जनता नगर, मंडाळा, मानखुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मिहिर कोटेचा यांना मतदान करा, असं आवाहन करण्यात आलं होतं. हे आचारसंहितेच्या नियमांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (Mumbai News) आहे.
याप्रकरणामुळे ऐन निवडणुकीत ईशान्य मुंबईत भाजपच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात आहेत. काल त्यांचा मुंबईमध्ये भव्य रोड शो पार पडला होता. ईशान्य मुंबईत भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा (BJP Candidate Mihir Kotecha) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन सुनील पालने केलं होतं. त्याच्याविरूद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.