Kalyan Lok Sabha : कल्याणमध्ये मतदानाच्या ५ दिवसांआधीच शिवसेनेला मोठा धक्का; सभेला मान मिळाला नाही, जिल्हाप्रमुखांचा राजीनामा

Lok Sabha Election 2024: मतदानाच्या ५ दिवसांअगोदर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. सभेला मान मिळाला नाही, म्हणून कल्याण मुरबाडच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok SabhaSaam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

कल्याणमध्ये मतदानाच्या ५ दिवसांअगोदर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. सभेला मान मिळाला नाही, म्हणून कल्याण मुरबाडच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता कल्याणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत शिंदे गटाचे कल्याण मुरबाडचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Lok Sabha Election 2024) यांना स्टेजवर स्थान मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच नाराजीतून मोरेंनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

शहरप्रमुख , आमदार, माजी आमदारांना स्टेजवर स्थान मिळालं. पण मला मात्र जणीवपूर्वक स्टेजवरून डावलल्याचा आरोप अरविंद मोरे यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी शिवसेना जिल्हा प्रमुखाचे (Arvind More Resigns) मानअपमानाचं नाट्य सुरू असल्याचं कल्याणमध्ये दिसत आहे. शिवसेना शिंदे गटात राजीनामा नाट्य सध्या सुरू आहे. जिल्हाप्रमुखाला स्टेजवर मान न मिळाल्यामुळे नाराजीचा सुर उमटत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मतदानाच्या ५ दिवसांअगोदर मोरेंनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Kalyan Lok Sabha
Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! ऐन निवडणुकीत रवींद्र वायकरांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे नेमकं कारण?

अरविंद मोरे यांनी कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा स्विकारण्याबाबत पक्षप्रमुख मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी कल्याणमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा (Shiv Sena Shinde Groups) होत आहे. यावेळी स्टेजवरील निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून नाव नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखास स्टेजवर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. परंतु जाणिवपूर्वक डावलल्याचा आरोप त्यांनी या पत्रामध्ये केला (Maharashtra Politics) आहे.

Kalyan Lok Sabha
Nashik Lok Sabha 2024: नाशिकमध्ये आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; ५ व्या टप्प्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे अन् PM मोदींची सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com