Bachu Kadu on Navneet Rana
Bachu Kadu on Navneet Rana Saam TV
लोकसभा २०२४

Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशानंतर आमदार बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; महायुतीला दिला थेट इशारा

Satish Daud-Patil

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

Bachu Kadu Vs Navneet Rana

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर बुधवारी (ता. २७) मध्यरात्री राणा यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशानंतर आमदार बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवनीत राणांच्या भाजप प्रवेशानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

"ज्यांनी आजवर भारतीय जनता पक्षाला शिव्या घातल्या. आंदोलने करून त्यांची कार्यालये फोडली, आता त्याच कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे हाती घ्यावे लागत आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. एवढी लाचारी अमरावतीतला कार्यकर्ता स्वीकारणार नाही. तो त्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, असं देखील आमदार बच्चू कडू म्हणाले.

"जरी भाजप पक्षनेत्यांनी कार्यकर्त्यांची किंमत केली नाही. तरी मला असं वाटतं, कार्यकर्त्यांनी 'अबकी पार ४०० पार' नारा विसरला पाहिजे. अमरावतीसारखी एखादी लोकसभेची जागा गेल्याने भाजपला काही फरक पडत नाही. ३०० जागा आल्या तरी मोदीजी यांचं सरकार सत्तेत येईल", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

रवी राणांनी मला खोकेवाल म्हणून हिणवलं : बच्चू कडू

"भाजपचे कार्यकर्ते जरी शरीराने नवनीत राणा यांच्या पक्षप्रवेशाला गेले असले, तरी त्यांच्या मनात विरोध आहे. मला आमदार रवी राणा यांनी घरात जाऊन मारू, खोकेवाला आमदार म्हणून हिणवलं आहे. मग एवढी लाचारी आम्ही सहन करणार नाही. भाजपवाल्यांनी ऐकलं मी ऐकणार नाही", असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

"नवनीत राणांना पाडणार उमेदवार आमचाच असेल"

"जो उमेदवार यांना पाडणार तो उमेदवार आमचा असेल, किंवा जो उमेदवार सक्षम असेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. आम्हाला कुणी अडवणारं नाही. आमचे नेते काही दिल्लीत बसले नाही. आमचे नेते शेतकरी असून आम्ही त्यांच्या सेवेसाठी कायम हजर आहोत, त्यामुळे ते आमचं ऐकतील", असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीला काही अर्थ राहीला नाही. भेट घेतली विषय तिथेच संपला असून आता आमचा नवीन अध्याय सुरू आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली, आता तुम्ही महायुतीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला असता, त्यांनी आम्हाला काढलं, तर आम्ही निश्चितच बाहेर पडू. तसेच त्याचं स्वागत देखील करू, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Voting | नाशकात Thackeray गट आणि BJP आमनेसामने

Maharashtra Lok Sabha Voting Live: अनिल अंबानी यांनी रांगेत उभा राहून बजावला मतदानाचा हक्क

Bangladesh MP: मोठी बातमी! बांगलादेशचे खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता, ३ दिवसांपासून शोधमोहिम सुरू

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट

Jalgaon crime : कुटुंब गाढ झोपेत; खिडक्यांच्या काचा फोडून लांबवीले ६७ हजाराचे दागिने

SCROLL FOR NEXT