manoj jarange patil congratulates bajrang sonwane after winning in beed loksabha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

जरांगे पाटलांची खासदार बजरंग सोनवणेंनी रात्रीत घेतली भेट,दिला महत्वपूर्ण शब्द (पाहा व्हिडिओ)

डॉ. माधव सावरगावे

मनोज जरांगे पाटील हे येत्या 8 जूनपासून उपोषणास बसणार आहेत. यादरम्यान त्यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने सक्रिय राहण्याचा शब्द बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग साेनवणे यांनी मनाेज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतल्यानंतर दिला. दरम्यान जरांगे पाटील यांनी साेनवणे यांचे खासदार झाल्याबद्दल शाल देऊन अभिनंदन केले.

माझ्या विजयात जरांगे फॅक्टर चालला अशी भावना बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांच्या विराेधात विजय मिळविलेल्या बजरंग सोनवणे यांनी रात्रीतच अंतरवाली सराटी गाठले. तेथे खासदार साेनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी बजरंग सोनवणे यांचे खासदार झाल्याबद्दल स्वागत करत त्यांचा सत्कार केला.

खासदार साेनवणे यांनी जरांगेंना प्रकृतीची काळजी घ्यावी अशी विनंती केली. न्यायहक्काच्या लढाईत सोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच 8 जूनपासून जरांगेंच्या उपोषणास पूर्ण ताकदीने सक्रिय राहण्याचा शब्द दिला. दरम्यान जरांगे आणि साेनवणे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

Marathi News Live Updates : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे.

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

SCROLL FOR NEXT