Ajit Pawar Speech Dadar Saam Tv
लोकसभा २०२४

Ajit Pawar Speech Dadar: २० तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ, अजित पवारांचा निर्धार

Maharyuti Rally At Shivajipark: शिवाजीपार्कवर महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये भाषण करत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यासोबतच यावेळी त्यांनी मुंबईकरांना मदतानाला जा आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केली आहे.

Priya More

'विरोधकांना विकासाचा कुठला मुद्दा राहिला नाही. २० तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. शिवाजीपार्कवर महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये भाषण करत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यासोबतच यावेळी त्यांनी मुंबईकरांना मदतानाला जा आणि महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा अशी विनंती केली आहे.

विरोधकांवर टीका करताना अजित पवार यांनी सांगितले की, 'विरोधकांना विकासाचा कुठलाच मुद्दा राहिला नाही. या निवडणुकीत आम्ही महायुतीच्या वतीने सातत्याने विकासाबद्दल बोलत आहोत. पण विरोधक त्याला फाटा देऊन नको ते भाषण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.' तसंच,'एक त्रयस्त नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले तर काय त्यांची भाषणं, काय त्यांचे शब्द अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, सर्व जाती-धर्माला न्याय देता आला पाहीजे याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही महायुतीच्या सरकारमधील आणि घटकपक्ष तसंच देशाच्या पंतप्रधानांची भूमिका देखील तिच आहे.', असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'असा काही एखादा मुद्दा काढायचा आणि त्यातून एखाद्या समजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची. देशाच्या पंतप्रधानांनी संविधान दिन साजरा करायला सुरूवात केली. काही जण संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. हे पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आहे. २० तारखेला मतदान केले तर त्यांना जशाच तसे उत्तर देता येईल. विरोधकांना विरोधकांची जागा दाखवता येईल.' असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार केला.

त्याचसोबत, 'शिवाजीपार्क हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नवं पर्व सुरू करतोय. पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून सर्वसमावेक्षक नेतृत्व देशाला मिळाले. मागच्या १० वर्षांच्या काळात ज्या पद्धतीने मोदींनी देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले ते गौरवास्पद काम आहे. मोदींचे कणखर नेतृत्व भारत देशाला प्रगतीपथावर घेऊ जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण करायचा आहे.', असे देखील अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

Kolhapur Travel : सह्याद्री पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायचंय? कोल्हापूरमधील 'या' किल्ल्यावर करा ट्रेक प्लान

SCROLL FOR NEXT