mahayuti leaders criticises omraje nimbalkar dharashiv lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

Dharashiv Latest Marathi News : ओमराजे निंबाळकर यांनी २०१९ च्या निवडणूकीत दिलेल्या जाहिरनाम्यावरुन आता महायुतीने निंबाळकर यांना घेरले आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv Lok Sabha Election :

आमच्या वरती टक्केवारीचा आरोप करणा-यांनी राज्यातील रुग्णवाहिकेत घोटाळा करुन जनतेच्या पैशावर कुणी डल्ला मारला हे जाहीर करावं असं आव्हान ओमराजे निंबाळकरांनी तानाजी सावंताना दिले. तर दूसरीकडे सन २०१९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काढलेल्या जाहिरनाम्यातील काेणते काम केले ते सांगा असे आव्हान आज महायुतीच्या नेत्यांनी पञकार परिषदेत केला. आराेप-प्रत्याराेपांमुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलेच ढवळू लागले आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शिराढोण येथील सभेत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील ॲम्बुलन्स घाेटाळ्यात शेण कोणी खाल्लं जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही इमानदार आहोत म्हणून तर खुट्टा खवून कुणाच्या बापाला न घाबरता इथे उभारलोय असे ओमराजेंनी नमूद केले. ते म्हणाले आमच्या वरती टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना मला एवढंच सांगायचंय की तुमच्या सारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही जर पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखे भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये पालथे पडलो असतो अशी टिप्पणी ओमराजेंनी केली.

ओमराजे निंबाळकरांचे नुसतंच आश्वासन

उस्मानाबाद लोकसभेच्या मतदानाला अवघे पाच दिवस उरले असताना धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत चाललय. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली.

निंबाळकर यानी २०१९ च्या निवडणूकीत दिलेल्या जाहिरनाम्यावरुन आता महायुतीने निंबाळकर यांना घेरले आहे. निंबाळकर यांनी जाहीरनाम्यातील एकही काम पुर्ण केले नसल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला.

ही कामं झालीच नाहीत

२१ टीएमसी पाणी, मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल,उद्योगाला चालना,दहा हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन बिनव्याजी एक लाख रुपये वापरता येणार असा जाहिरनामा निंबाळकर यांनी दिला होता. यामधील एकही काम पुर्ण झाले नसल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT