Vinod Patil Mahayuti  saam
लोकसभा २०२४

Maharashtra Election: छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या अडचणीत वाढ; निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठाम

Maharashtra Election: विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. जर विनोद पाटील यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर महायुतीच्या अडचणी वाढू शकतात.

डॉ. माधव सावरगावे

Vinod Patil On Chhatrapati Sambhaji Nagar Loksabha Candidature :

छत्रपती संभाजीनगर महायुतीच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक नेते विनोद पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी परत उमेदवारीची मागणी केलीय. शिवसेना आणि भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, असं विनोद पाटील एका व्हिडिओमध्ये म्हणालेत.

छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचा उमेदवारीवरील तिढा सुटलाय. पण विनोद पाटील यांच्या आरोपामुळे युतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विनोद पाटील यांनी संदिपान भुमरे यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. आता निवडणूक लढवण्याचा निर्णय जनतेशी संवाद साधून घेणार असल्याचं पाटील म्हणालेत. संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानतंर विनोद पाटली यांनी आपल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ तयार करतो तो व्हायरल केलाय. उमेदवारीची मागणी करताना आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरमधील विजय मिळवण्याचे गणित आहे,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान जर विनोद पाटील वेगळा निर्णय घेऊन लोकसभा निवडणूक लढवतील तर महायुतीची अडचण वाढू शकते.

विनोद पाटील यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी काही नेत्यांच्या विरोधामुळे नाकारण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. दरम्यान शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विनोद पाटील यांनी हा आरोप केल्याने पाटील हे टोकाचा निर्णय घेऊन महायुतीविरोधात दंड थोपटतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असतानाही छत्रपती संभाजीनगरमधील दोन आमदार आणि एका राज्यसभेच्या खासदारांचा विरोध होता म्हणून उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केलाय. विकासासाठी मी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह छत्रपती संभाजी नगरमधील जनतेने माझ्याकडे धरला होता. त्यामुळे आता पुढील निर्णय घेताना परत एकदा जनतेसमोर जाणार आणि जो निर्णय घेण्यात येईल त्यावर काम करू असं पाटील यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

पाटलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी साम टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिलीय. विनोद पाटील यांनी उमेदवारी मागितली असली तरी ते चर्चेनंतर आपली भूमिका बदलतील. महायुतीसोबत राहतील, असा दावा महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केलाय. लोकशाहीत तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, मात्र ते आम्हालाच मदत करतील, अशी मला खात्री आहे असे त्यांनी सांगितले.

माझ्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे किंवा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील या कुणाचेही आव्हान नाहीये, लोकांना चांगल्या उमेदवारांची अपेक्षा होती. उशिरा का होईना पण मला उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करणे, हे माझे सर्वप्रथम काम असेल, असे भुमरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation: निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा डाव हाणून पाडायचा, नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Soyabean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत; पाने खाणारी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Sachin Tendulkar Net Worth: लंडनमध्ये घर अन् अलिशान कार; क्रिकेटर सचिन तेंडूलकरची संपत्ती किती?

Diabetes Care : डायबिटीजमध्ये गोड खाणे शक्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT