Prakash Ambedkar-Mahavikas Aghadi
Prakash Ambedkar-Mahavikas Aghadi Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची चर्चा कुठपर्यंत आली? 'वंचित'बाबत भूमिका काय?

प्रविण वाकचौरे

गिरीश कांबळे | मुंबई

Mumbai News :

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊन पाच दिवस उलटून गेले आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराला दणक्यात सुरुवात देखील केली आहे. भाजपने देखील आपल्या २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या बैठकांची मालिका संपण्याचं नाव घेत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या मित्रपक्षांशी चर्चा सुरु असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा केली असून त्यांना महाविकास आघाडीत कसं सामील करुन घेता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

जागावाटपाबाबत आज किंवा उद्या सर्व फायनल होईल. मित्रपक्षांचा देखील सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळे एक दोन दिवसात सर्व जाहीर होईल. मित्र पक्षांशी चर्चा सुरु आहे, त्यामुळे लवकरचं सगळं स्पष्ट होईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा देखील झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. वंचितने काँग्रेसच्या ७ जागांना पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. पण महाविकास आघाडीतल्या इतर मित्रपक्षांसोबत त्यांची काय भूमिका हे पवारांनी समजून घेतले, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या दोन दिवसात वंचितबाबत स्पष्टता करून महाविकास आघाडीकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र

त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले होते. ज्यात त्यांनी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला होता.

शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, असा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : खेळाडूंना 11 कोटी, शेतकऱ्यांना काय? क्रिकेटपटूंवर कोट्यवधींची उधळण; वडेट्टीवार, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Assembly Bypoll 2024: पुन्हा NDA विरुद्ध INDIA आघाडी! 7 राज्यांच्या 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक, काय आहे राजकीय समीकरण?

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

IND VS ZIM : कर्णधार शुभमन गिलने लाजिरवाण्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT