Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज; बैठकीत पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत काय रणनीती ठरली?

Eknath Shinde Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना पातळी सोडू नका, शिव्याशाप देऊ नका, वाद टाळा, असं मार्गदर्शन केलं.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeYandex

Eknath Shinde Group :

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जागावाटपासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना पातळी सोडू नका, शिव्याशाप देऊ नका, वाद टाळा, असं मार्गदर्शन केलं. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रवक्त्यांना मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, 'विरोधक खालच्या पातळींवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांची पोलखोल करा. त्यांना हिंदुत्व सोडलं. बाळसाहेबांचे विचार सोडले आहेत. शिवाजी पार्कमध्ये हिंदू बांध भगिनी म्हणायची त्यांना लाज वाटली. ते बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध वागत आहेत. पण तुम्ही कमरेखालची टीका करू नका. त्यांचा खरा चेहरा समोर आणा. ते बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणत नाही'.

CM Eknath Shinde
Loksabha Election 2024: महायुतीत जाण्यास मनसे नेते इच्छुक? राज ठाकरेंची शिंदे- फडणवीसांसोबत दीड तास खलबतं; भूमिकेकडे लक्ष!

'पदाधिकाऱ्यांनी मित्र पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊ नये. एका ठिकाणच्या आरोप प्रत्यारोपांचे पडसाद हे सर्वत्र उमटतात. पक्षाची जी भूमिका आहे, त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही. आपण मराठा आरक्षण दिलंय. आपलं कोर्टात टिकणारं आरक्षण आहे. पोलीस भरती ही या आरक्षणानुसारच होत आहे. मराठा समाजाला न्याय दिला, ओबीसींवर अन्याय केला नाही. सरकारने केलेली कामं मुद्देसुद मांडावीत, असे ते पुढे म्हणाले.

CM Eknath Shinde
Loksabha Election: स्वत: हजारो कोटी घेतले, आमची बँक खाती गोठवण्याचा कट; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

'५०-६० वर्षात कॉंग्रेसने काय केलं? गेल्या १० वर्षात काय झालं हे लोकांसमोर मांडा. अडीच वर्ष सरकार घरी बसलं होतं. तर गेल्या दोन वर्षात शासन लोकांच्या दारी गेलं आहे. हे लोकांना सांगा. विरोधक मतं मागायला येतील, तेव्हा त्यांना विचारा तुम्ही काय केलं? असे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसेच फक्त राजकीय मुद्दे नको विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडा. आपल्याकडे खूप सांगण्यासारखं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com