Uddhav And Raj Thackeray Voting  
लोकसभा २०२४

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Uddhav And Raj Thackeray Voting : उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसला तर राज ठाकरेंनी तब्बल 19 वर्षानंतर पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान केलंय. त्यामुळं ठाकरेंच्या मतांची चर्चा रंगलीय. त्यावरचा हा रिपोर्ट...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद पाटील, साम प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरेंनी वांद्रे भागात तर राज ठाकरेंनी दादरमध्ये सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावलाय. मात्र यंदा दोघांच्या मतदानाबाबत मोठी चर्चा रंगलीय. कारण उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसला मत दिलंय. विशेष म्हणजे मतदान हे गुप्त असतं. पण उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आपण काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांना मत देणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं.

तर दुसरीकडे मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे आणि त्यांच्यासाठी प्रचारसभा घेणा-या राज ठाकरेंनीही मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे यांच्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीचे मतदान करण्याचं आवाहन करणा-या राज ठाकरेंनी दोन दशकांनंतर पहिल्यांदाच धनुष्याला मतदान केलं.

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत काळाची चक्र अशी काही फिरली की राज ठाकरेंना 19 वर्षांपुर्वी फारकत घेतलेल्या धनुष्यबाणाला तर उद्धव ठाकरेंनी आयुष्यभर विरोध केलेल्या काँग्रेसला मतदान करावं लागलंय. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या मतदानाचीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT