Sanjay Raut Claim On Devendra Fadanvis Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut News: राजीनामा कशाला देताय, जनतेनेच तुम्हाला घरी बसवलंय; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Sanjay Raut On Devendra Fadanvis: राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदातून मुक्त करण्याची मागणी केली. यावर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ६ जून २०२४

"ज्या पद्धतीने राज्यात सुडाचे कपटाचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांगल्या राजकारणाचा नाश करण्याचे काम केले. त्याचा बदला राज्यातील जनतेने घेतला," असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक निकालावरुन भाजपवर तोफ डागली. दिल्लीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"या राज्यातील एक पिढी संपवण्याच काम देवेंद्र फडणविसांनी केले. न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तींना घरी बोलावून दम देण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या टीमने केले. मोदी शाह यांच्यावर लोकांचा जेवढं राग नाही तेवढा राग फडणवीस यांच्यावर आहे. राजीनामा कशाला देता लोकांनी तुम्हाला घरी बसवलं आहे," असा घणाघात संजय राऊत यांनी केला,

तसेच "नवाब मलिक, अनिल देशमुख यांना जाऊन भेटा अनेक गोष्टी समजतील. चांगले काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांचा छळ केला. अजून अनेक गोष्टी तुम्हाला पहायच्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळया अक्षरात लिहिलं जाईल," असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मोदींवर टीका

"नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ सोपा नाही. मोदींची भाषा पाहा, संघ, पक्ष यांचा मोदींना विरोध आहे. पराभूत झालेला माणूस पुन्हा पंतप्रधान कसा होऊ शकतो? संसदीय पक्षात मतदान घ्या आणि विचारा मोदी हवेत का? मोदींनी शपथ घेतली तरी त्यांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. संघातील टॉप लीडर पर्यायाचा शोधत आहेत. आज संघ एखादा निर्णय घेऊ शकतो, आणि मोदींना घरी पाठवू शकतात," असा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT