संजय जाधव, बुलढाणा|ता. २८ मार्च २०२४
राज्यातील महायुतीमध्ये अद्याप लोकसभेच्या जागावाटपावरुन जोर बैठका सुरू आहेत. अशातच बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मोठी बंडखोरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी चांगलीच वाढणार असल्याचे दिसत आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)
शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप लोकसभा निवडणुकांसाठी एकाही उमेदवाराची घोषणा अथवा यादी जाहीर करण्यात आली नाही. येत्या दोन दिवसात शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच बुलढाण्यात (Buldhana) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
बुलढाण्यात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याआधीच संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिंदे गटात बंडाची शक्यता वर्तवली जात आहे. "आयुष्यात पहिल्याच वेळेस खासदारकीचा अर्ज भरला आहे. मला कोणाचाही आदेश नव्हता, पक्ष संघटनेच्या आग्रहा खातीर मी अर्ज दाखल केला, " अशी प्रतिक्रिया आ संजय गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय गायकवाड यांना तात्काळ फोन करुन याबाबत विचारणा केली. यावेळी संजय गायकवाड यांनी साहेब मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, मी मरेल पण तुमच्या पुढे जाणार नाही, असे सांगितले. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख कधी आहे असे विचारले असता ४ तारीख असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.