Amol Mitkari On Sharad Pawar  Saam Tv
लोकसभा २०२४

Amol Mitkari On Sharad Pawar: तुमच्या मनात नेमकं काय होतं?, शरद पवारांच्या त्या विधानावर अमोल मिटकरींचा सवाल

Priya More

अक्षय गवळी, अकोला

'2004 मध्ये राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असतानांही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाहीय?', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शरद पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पक्षाकडे अनुभवी चेहरा नसल्याने तेव्हा मुख्यमंत्रीपदावर दावा केला नसल्याचं स्पष्टपणे सांगितले. यावर मत व्यक्त करताना अमोल मिटकरी (Amol Mitakari) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांना सवाल केला आहे. 'पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा कोणता अनुभव होता?', असा सवालही अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, 'पवारसाहेबांच्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्याकडे मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार नव्हता असे कसे म्हणू शकता?. 2004 मध्ये आरआर आबा, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, पद्मसिंग पाटील, स्वत: अजित पवार उमेदवार होते. यापैकी असलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं? की उमेदवार नव्हता. हे पुन्हा साहेबांनी महाराष्ट्रला सांगितलं पाहिजे.

अमोल मिटकरी यांनी पुढे सांगितले की, 'विशेष म्हणजे 1978 साली सरकार पाडण्यासाठी कोणी भूमिका घेतल्या?, पृथ्वीराज चव्हाणसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादले गेले. त्यांना कुठला अनुभव होता?, तेव्हा त्यांचा विरोध दिसला नाही.' तसंच, 'साहेब म्हणतात 2024 ला आमच्याकडे पाहिजे तसा उमेदवार नव्हता. 2019 च्या काळात दोन्ही सभागृहाचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? तुमच्या मनात नेमकं काय होतं.', असा सवाल आमदार मिटकरींनी उपस्थित केलाय.

'सुप्रियाताई राजकारणात असतील तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. एकीकडे 2006 पासून सुप्रियाताई राजकारणात आल्या. त्यामुळे अनेक गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लादले गेलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांना विरोध का झाला नाही? ठाकरेंना कुठलाही अनुभव नव्हता त्यांना पुढं कोणी केलं?' असा प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय.

'2004 एवढ्या जागा निवडून आल्यानंतरही संधी का हुकवली गेली? हाच प्रश्न अजित पवारांनी विचारला. हा सर्व संभ्रम आहे त्यामुळे साहेबांनी जाणीवपूर्वक युक्तिवाद केलाय.', असे वक्तव्य मिटकरींनी केले आहे. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले की , 2004 ला आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता. अजित पवार तेव्हा नवखे होते. भुजबळांना पद दिलं असतं तर पुढे पक्ष फुटला असता आणि प्रफुल्ल पटेल हे 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी इच्छूक होते. म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT