Sanjay Raut On Raj Thackeray Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut: राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली; संजय राऊत यांचा सवाल

Rohini Gudaghe

मयुर राणे साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics Sanjay Raut Press Conference

काल शिवाजी पार्कवर पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी, राज ठाकरेंना कोणती फाईल दाखवली, असा सवाल केला आहे. (Maharashtra Lok sabha Election)

मनसेचा काल शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे सैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत असल्याचं जाहिरपणे सांगितलं. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरून टीकेची झोड उठवली आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू (Sanjay Raut Press Conference) आहे. त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देतोय. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल.

तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला हे त्यांनी सांगावं? असंही राऊत म्हणाले आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी मोदी आणि शहा यांच्याशी लढतो आहोत.भाजपने जेव्हा खरे दात दाखवायला (BJP) सुरुवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो. आम्ही स्वतंत्र राहिलो आजही आमची भूमिका महाराष्ट्र संदर्भात स्पष्ट आहे. जर कोणी महाराष्ट्रावर घाव घालत असेल स्वाभिमानाला ठेच पोहोचत असेल तर आम्ही एकत्र येऊ असंही वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

राजकीय विचार कशाला म्हणतात, ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून समजून घेतलं पाहिजे. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू (Sanjay Raut On Raj Thackeray) आहेत. राजकारणातून ओवाळून टाकलेले नेते आणि व्यभीचारी यांना भाजपाने घेतले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ अशी अनेक नावं आहेत, ज्यांनी बिनशर्त भाजपसोबत जायचं मान्य केलं. ते का गेले, कोणाच्या दबावामुळे गेले हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली.

भाजपचा व्यभीचार जगजाहीर आहे. अशा व्याभीचारी पार्टीबरोबर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले. ते म्हणाले की, ठाकरे नावाला कुणी झुकवू शकत नाही. उद्धव ठाकरेंना (Maharashtra Politics) झुकविण्याचा प्रयत्न झाला ते झुकले नाहीत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला पण तुटलो नाही. त्यांच्याशी लढत आहोत. महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही निर्णय आम्हाला दिसत नाही. अमित शहा आणि मोदींविरोधात नेता कुठलाही ठाम उभा राहील, पण असं दिसत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT