Maharashtra Politics 2024 : विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम नॉटरिचेबल?; नाराजीवरून नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : नाराज असलेले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांनी मात्र विशाल पाटील यांनाच विचारून हा निर्णय घेण्यात आला आल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital
Published On

Maharashtra Politics 2024

लोकसभा निवडणुकांचे अर्ज दाखल करण्याची वेळ आलं तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली असून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांच्या वाटाघाटीनंतर काँग्रेसनेही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील, तसेच आमदार विश्वजित कदम हे नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांनी मात्र विशाल पाटील यांनाच विचारून हा निर्णय घेण्यात आला आहे. ते नाराज असतील तर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण सांगलीत जावून त्यांच्याशी चर्चा करतील, असं म्हटलं आहे.

सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या, तिथल्या नेत्यांच्या भावना स्वाभाविक आहेत. आम्ही पण ती लढाई लढलो, पण शेवटी कोणत्या गोष्टीला कुठपर्यंत ताणायचं असतं त्याला देखील मर्यादा असतात. सांगलीच्या जागेसंदर्भात बऱ्याच वाटाघाटीनंतर हायकमांडने निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात विशाल पाटील यांच्यासोबत आमची चर्चा झाली त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. तरीही ते नाराज असतील तर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सांगलीत जातील आणि त्यांच्याशी चर्चा करतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज आमच्यासमोर लोकशाही आणि संविधान वाचवणे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे एक पाऊल मागं झालं म्हणून आमचं सगळं संपलं असं कोणी समजण्याचं कारण नाही. भाजपमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी हा लढा आहे आणि त्यासाठी एकजुटीने आपल्याला कामाला लागायचं आहे, असं आवाहन नाना पटोले यांनी सांगलीतील कार्यकर्त्यांना केलं.

Maharashtra Politics 2024
Abki Baar 400 Par: कसं गाठता येणार भाजपला 400 पार? चंद्रकांत पाटलांनी गणितंच मांडला (Video)

महाविकास आघाडीची आज शिवालय कार्यालयात तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत सांगलीची जागा शिवसेनेकडेच राहील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे सांगलीमधून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. शिवसेनेने घटक पक्षांना विचारत न घेता सांगलीची जागा जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बराच वाद सुरू होता. काँग्रेस पक्ष या जागेवरून निवडणूक लढण्यास आग्रही होता. मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे गेल्यामुळे शिवसेनाही सांगलीच्या जागेवर अडून बसली होती.

Maharashtra Politics 2024
Udayanraje Bhosale : शरद पवार साेमवारी साता-यात येणार आहेत? मी बोलण्यापेक्षा सर्वसामान्यांना विचारा असं का म्हणाले उदयनराजे भाेसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com