Abki Baar 400 Par: कसं गाठता येणार भाजपला 400 पार? चंद्रकांत पाटलांनी गणितंच मांडला (Video)

चंद्रकांत पाटील म्हणाले अबकी बार 400 पार हा आकडा आता विरोधकांना ही विश्वास वाटायला लागला आहे. प्रशांत किशोर म्हणतात 2024 ला आपण आराम केला पाहिजे. आपला पैसे श्रम वाचेल.
Chandrakant Patil
Chandrakant Patil saam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur Constituency :

आत्ताच आपल्याकडे 353 जागा आहेत. आपल्याला फक्त 47 जागा जिंकायच्या आहेत. त्या झाल्या की अब बार 400 (abki baar 400 par) पार हाेणार आहे. आता मोठं टार्गेट नाही परंतु सर्व मतदारसंघात महायुतीचा (mahayuti) उमेदवार जिंकला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

गुढी पाडवा (Gudi Padwa 2024) निमित्त आज (मंगळवार) महायुतीचे खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) यांच्या प्रचार कार्यालयाचे काेल्हापूर येथे उदघाटन झाले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आदी उपस्थतीत हाेते.

Chandrakant Patil
Mango Price in Navi Mumbai: वाशी एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक, जाणून घ्या डझनाचा दर

चंद्रकांत पाटील म्हणाले अबकी बार 400 पार हा आकडा आता विरोधकांना ही विश्वास वाटायला लागला आहे. प्रशांत किशोर म्हणतात 2024 ला आपण आराम केला पाहिजे. आपला पैसे श्रम वाचेल.

मोदींनी जाती पाती पलीकडे जाऊन लाभार्थी नावाची जात निर्माण केली. जो गरजु त्याला लाभ दिला. गरजवंत यांना लाभ दिला असेही पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाटील पुढं बाेलताना म्हणाले तामिळनाडू मध्ये जागा येतील की नाही माहिती नाही मात्र तेथील लोक म्हणतात माेदी अबकी बार 400 पार, हा विश्वास त्यांना पटू लागला आहे. दरम्यान मी पुण्याला गेल्यामूळे विरोधकांना आनंद झाला मात्र मी एक दिवस येतो आणि सगळी कामे करून जातो असा टाेला पाटील यांनी विराेधकांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Chandrakant Patil
Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com