NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawar  Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar: अमित शहांना शेतीचं ज्ञान मर्यादित; १० वर्ष काय केलं सांगा? शरद पवारांचं टीकास्त्र

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर साम टीव्ही, पुणे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित झाला. या जाहीरनाम्यामध्ये महिला, तरुण, तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावासह शाळांचा सेफ्टी ऑडिटसारख्या अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात (Maharashtra Politics) आलाय.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील दहा वर्षात शेती संबधीचे प्रश्न वाढले आहेत. हा कालखंड अमित शाह यांच्या पक्षाकडे होता. या कालावधीत त्यांनी काय केलं ते सांगावे, असं म्हटलं (NCP Sharad Pawar On Manifesto) आहे. शरद पवार म्हणाले की, अमित शाह यांचे शेती संबधीच ज्ञान मर्यादीत, त्यावर जास्त काय बोलायचे? ⁠त्यांनी दहा वर्षात काय केले ते सांगावं. वीस वर्ष आधी काय झाले, चाळीस वर्ष आधी काय झाले हे विचारु नये, असं म्हटलं (Lok Sabha) आहे.

राज्यपालांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरुन करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शपथनाम्यामध्ये करण्यात आली (Pune Politics) आहे. या मागणीचं समर्थमन शरद पवार यांच्याकडुन करण्यात आलं आहे. अमित शहांना शेतीचं ज्ञान मर्यादित आहे, अशी टीका यावेळी शरद पवारांनी केली आहे.

विदर्भात गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर अमित शाहंकडे काय उत्तर आहे? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला (Sharad Pawar News) आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना आत्महत्या पाहून मनमोहन सिंगांना विदर्भात आणून कर्जमाफी करायला सांगितली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मागणी केली त्याचा आनंद आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

आज पुण्यात जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार गीत देखील रिलीज करण्याात आलं आहे. या गीतामध्ये ⁠तुतारी आणि शरद पवार यांचा उल्लेख आहे. गीतामध्ये ⁠शरद पवार यांच्यावर मुख्य फोकस करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील लार्गो पिझ्झा हॉटेल आग

Astro Tips: संध्याकाळी या वेळी लावा दिवा, लक्ष्मी येईल घरात

Mumbai News : ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, मुलुंडमधील 5 शिवसैनिकांना अटक

Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Hingoli News: वय उलटूनही लग्न जमेना, नैराश्यातून तरुणाने संपवलं जीवन; हिंगोलीतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT