मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे नाराज आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे दानवे शिंदे गटात प्रवेश करतील तसंच महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढतील, अशा चर्चा देखील सुरू आहेत. या सर्व चर्चांवर आता अंबादास दानवे यांनी स्वत: पडदा टाकलाय. त्यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. (latest politics news)
अंबादास दानवेंच्या भूमिकेवर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, मी एकांगी निर्णय घेत नाही. दानवे शिंदे गटामध्ये जातील, असे वाटत नाही. अंबादास लहान आहे, म्हणून त्यांची मनधरणी करावी (Sambhajinagar Lok Sabha Election) लागेल. मी दानवेंचा गुरु आहे. ते माझे शिष्य आहेत, असं का करतात माहीत नाही. काल मी दानवेंशी प्रेमाने बोललो, ते ऐकतील असं खैरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मी कडवट शिवसैनिक
मी उद्धव आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. गेली पाच वर्षे येथे काम करत आहे. लोकं मला खासदार म्हणून पाहत आहेत. मागील निवडणूकीत पराभव झाल्यानंतरही मी काम सुरूच (Sambhajinagar News) ठेवलं. दानवेंना तिकीट मिळालं तरी मी मी पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे. लोकं म्हणतात की मी नेतृत्व उभं केलं नाही मग अंबादास दानवे मोठा कसा झाला, असा सवाल त्यांनी बोलताना केला.
मला तिकीट मिळालं नाही मिळाले तरी मी इथेच राहणार आहे. मला अनेकांनी फोन केले, पण मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक ((Lok Sabha Election 2024) आहे. इथं मोदी जी लढायला आले तरी चालेल, मला तिकीट मिळाल्यावर मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल, अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली आहे.
अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण
संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अंबादास दानवेंच्या भूमिकेवर चंद्रकांत मोरे यांनी वक्तव्य केलं आहे. तर अंबादास दानवे यांनी मी नाराज असल्याच्या चर्चांना काहीच अर्थ (Chandrakant Khaire Vs Ambadas Danve) नाही. शिंदेंची शिवसेना फक्त पाच दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार. मी सर्वसामान्य शिवसैनीक आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चांकडे लक्ष देऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली होती.
गेल्या १० वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छूक (Maharashtra Politics) आहे. मी माझी इच्छा कधीच लपवून ठेवलेली नाही. हे पक्षप्रमुखांना देखील माहिती आहे, अशा शब्दांत दानवेंनी चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.