Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : पियुष गोयल यांच्याविरोधात वंचितकडून उमेदवारी जाहीर; राजकीय समीकरणं बदलणार

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी अवघ्या दोनच जागांवर महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यातील उत्तर मुंबईच्या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

संजय गडदे

मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी अवघ्या दोनच जागांवर महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यातील उत्तर मुंबईच्या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियुष गोयल यांच्याविरोधात वंचितकडून विनासिंग यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतार्यंतच्या इतिहासात उत्तर मुंबईत उत्तर भारतीय व्यक्तीला पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर झाली आहे.

उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेऊन उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवार देऊ नका, अशी विनंती देखील करणार असल्याचे विनासिंग यांनी म्हटलं आहे. महिला आणि शिक्षण या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचं विना सिंग यांनी म्हटलं आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघात एकमेव मालवणी मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात असून उर्वरित मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार निवडून आलेले आहेत. या ठिकाणी माजी राज्यपाल राम नाईक यांच्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघात मागील दहा वर्ष खासदारकीची टर्म पूर्ण केली. मात्र आता गोपाळ शेट्टी यांच्या वयाचे कारण पुढे करत भाजपाकडून या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केले.

दुसरीकडे हा मतदारसंघ अनेकदा काँग्रेस पक्षाकडून उमेदवार उतरवून लढवण्यात आला मात्र राम नाईक यांचा पराभव अभिनेता गोविंदा याच्या कडून झाला यानंतर पुन्हा काँग्रेसला या ठिकाणी कधीही संधी मिळाली नाही आताही या ठिकाणी काँग्रेसकडे प्रबळ असा उमेदवार नसल्यामुळे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली होती मात्र मुंबईत काँग्रेसच्या वाटेला असलेल्या या जागेवर विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळणे अवघड होते अशातच अजूनही या ठिकाणी काँग्रेस कडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही मात्र वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी बिना सिंग या उत्तर भारतीय महिलेला उमेदवारी देण्यात आली आहेया मतदारसंघात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार बहुसंख्येने असून दुसरीकडे मुस्लीम मतदारांची ही संख्या मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT