Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : मतदानानंतरही बीडचा वाद शमेना; 'मतमोजणीला बीडचे अधिकारी नको', आयोगालाच लिहिलं पत्र

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या प्रचारादरम्यान जेवढी बीडच्या निवडणूकीची चर्चा होती. तेवढीच चर्चा मतदानानंतरही सुरू आहे. बीडच्या मतमोजणीत बीडचे अधिकारी नको अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय.

Sandeep Gawade

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभेच्या प्रचारादरम्यान जेवढी बीडच्या निवडणूकीची चर्चा होती. तेवढीच चर्चा मतदानानंतरही सुरू आहे. बीडच्या मतमोजणीत बीडचे अधिकारी नको अशी मागणी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. भाजपच्या पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे राजकारण अधिकच तापलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्यांवरून वादग्रस्त ठरलेल्या बीडमध्ये अजूनही वाद थांबायला तयार नाही. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यातील वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात गेलाय. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी थेट आयोगाला पत्र लिहून बीडमधील अधिका-यांची तक्रार केलीय. बीड जिल्ह्यातल्या अधिका-यांना मतमोजणीपासून लांब ठेवण्याची मागणी सोनवणेंनी आयोगकडे केलीय. या अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत ठेवलं तर हे जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील.

बीड जिल्ह्यात बोगस मतदान आणि बुथ कॅप्चर केल्याचा आरोप करत शरद पवार गटानं यासंजर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तर त्यावर सुनिल तटकरेंनी जोरदार प्रहार केलाय. तर बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर महाविकास आघाडीने हाच मुद्दा राज्यभर लागू करण्याची मागणी केलीय.

शरद पवार गटानं यापूर्वीच बीडमध्ये नव्यानं मतदान घेण्याची मागणी केली होती. आता मतमोजणीसाठी स्वजिल्ह्यातल्य़ा अधिका-यांना दूर ठेवण्याची मागणी करण्यात आलीय. निवडणूक आयोग या पत्रांची दखल घेणार का? चार जूनच्या निकालावर याचा परिणाम होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT