Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरेंनी मारलं शिवाजी पार्कचं मैदान; उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच

Lok Sabha Election 2024 : मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीच तोफ धडाडणार आहे. मुंबई महापालिकेनं मनसेच्या अर्जाला मंजुरी दिली असून उद्धव ठाकरेंचा अर्ज नामंजूर केलाय.

Sandeep Gawade

श्रीकांत घुले

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीच तोफ धडाडणार आहे. मुंबई महापालिकेनं मनसेच्या अर्जाला मंजुरी दिली असून उद्धव ठाकरेंचा अर्ज नामंजूर केलाय. 17 मे रोजी ही सभा होणार असून पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसणार आहेत. पाहुयात, यासंदर्भातला खास रिपोर्ट.

शिवाजी पार्कवरील राजकीय सभांना ऐतिहासिक परंपरा आहे. सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं म्हणून राजकीय पक्षांमध्ये अनेकदा चढाओढ असते. शिवाजी पार्क मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. मात्र शिवाजी पार्कचं मैदान राज ठाकरेंनी मारलंय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर 17 मे रोजी मनसे महायुतीसाठी जाहीर सभा घेणार आहे. राज ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान मोदीही 17मे रोजी मनसेच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी 2017 साली महापालिकेच्या निवडणुकीत शिवाजी पार्कवरून उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये असाच संघर्ष रंगला होता. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाजी मारली होती. आणि राज ठाकरेंवर रस्त्यावर सभा घेण्याची वेळ आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत होते. आता राज्यातली राजकीय समीकरणं बदलली असून राजकीय मित्र आणि शत्रूही बदलले आहेत. आता उद्धव ठाकरेंना बीकेसीच्या मैदानावर सभा घ्यावी लागणार आहे.

राज ठाकरेंनी मोदींच्या नावानं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. 17 मे रोजी होणा-या शिवाजी पार्कच्या सभेत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांच्या निशाण्यावर कोण असणार याबाबत सा-या महाराष्ट्रालाच उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

Sangli : भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप, नगरसेवकांमध्ये धक्काबुकी; विरोधी पक्षनेते म्हणाले, भाजपपुढे झुकणार नाही! VIDEO

सांगलीत एसटी बसचा समोरासमोर अपघात, 2 ते 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

7 Dogs Trailer: बॉलिवूड स्टार्सच्या स्वॅगने '7 डॉग्स'चा ट्रेलर गाजला; सलमान-संजयच्या जोडीने जिंकलं चाहत्यांचं मनं

SCROLL FOR NEXT