Maharashtra Politics 2024 : 'साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती'; बारामतीच्या बाहेर दादांचं भावनिक कार्ड

Lok Sabha Election 2024 : बारामतीचं मतदान झालं असलं तरी पवार विरूद्ध पवार संघर्षाची धार काही कमी होईना. अजित पवारांनी आता इतर मतदारसंघांच्या प्रचारात इमोशनल कार्ड बाहेर काढलंय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

प्रवीन देवळेकर

बारामतीचं मतदान झालं असलं तरी पवार विरूद्ध पवार संघर्षाची धार काही कमी होईना. अजित पवारांनी आता इतर मतदारसंघांच्या प्रचारात इमोशनल कार्ड बाहेर काढलंय. शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, असं विधान अजित पवारांनी केलंय. पवारांसाठी दोन वेळा राजीनामा दिल्याचाही दावाही त्यांनी केलाय. दरम्यान कुणाला काय मिळालं, तुम्हीच तुलना करा, असा प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना दिलंय. शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून अजितदादांवर खरचं अन्याय झालाय का पाहुयात या रिपोर्टमधून.

बारामती लोकसभेच्या मतदानानंतर आता शिरूरमध्ये काका पुतण्याच्या लढतीचा झंझावात सुरु झालाय....अजित पवारांनी मात्र शिरुरच्या मैदानात भावनिक कार्ड बाहेर काढलंय. शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर मला नक्कीच संधी मिळाली असती असा राग पुन्हा एकदा अजित पवारांनी आळवलाय.. अजित पवारांच्या या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन दिलंय.. शरद पवारांसोबत पक्ष उभा करणाऱ्या अजित पवारांऐवजी सुप्रिया सुळेंनाच संधी मिळाली असती असा दावा फडणवीसांनी केलाय. तर राजकारणात नेमकं कुणाला काय मिळालं याचा हिशोब तुम्हीच मांडा असा टोला सुप्रिया सुळेंनी हाणलाय.

शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही अशी अजितदादांची खंत आहे. मात्र प्रत्यक्षात कुणाला काय मिळालं यावरही एक नजर टाकुयात. अजित पवारांची राजकीय कारकीर्द पाहता . महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. अजितदादांनी विक्रमी 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय. याशिवाय वित्त, ऊर्जा, जलसंपदा अशी महत्त्वाची खाती अजित पवारांकडे राहिलीयत. दुसरीकडे सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्या. मात्र खासदार म्हणूनच राहिल्या.

Maharashtra Politics 2024
Jayant Patil : 'कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं...'; भरसभेत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार

यावरून महाराष्ट्रात अजित पवार आणि दिल्लीत सुप्रिया सुळे अशी पक्षाची अनौपचारिक विभागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांनी वेळोवेळी डावललं जात असल्याची खंत व्यक्त केलीय..मात्र बारामतीत बाजूला ठेवलेल्या या भावनिक मुद्याला त्यांनी आता इतर मतदारसंघातल्या प्रचारात मुख्य मुद्दा बनवलाय. य़ाचा दादांना फायदा होणार की तोटा हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Maharashtra Politics 2024
Jayant Patil : 'कोणाला वाईट वाटत असेल पण मला समाधान वाटलं...'; भरसभेत जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींचे मानले आभार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com