Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर; शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा

Lok Sabha Election 2024 : 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या सभेला मनसेप्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय.

Sandeep Gawade

विनोद पाटील

मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या सभेला मनसेप्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय.

राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घेण्यावरून अनिल परबांनी निशाणा साधलाय.. मला माझ्या कडेवर दुसऱ्याची पोरं खेळवायची नाहीत असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता कुणाची पोरं खेळवणार आहेत असा सवाल अनिल परबांनी केलाय. मला माझ्या कडेवर दुसऱ्याची पोरं खेळवायची नाहीत असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता कुणाची पोरं खेळवणार आहेत.

या जाहीर पाठींब्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एका मंचावर दिसणार आहेत. महायुतीची अखेरच्या टप्प्यातील ही अखेरची सर्वात मोठी सभा असणार आहे. त्यामुळे या सभेतून राज ठाकरे आणि मोदी कुणाचा समाचार घेतात याबाबत उत्सुकता आहे. कारण मोदींची चारशे पारच्या घोषणेवर ठाकरेंनी तडीपारची घोषणा दिलीय.

राज्यात आता केवळ अखेरच्या टप्प्याचं मतदान बाकी आहे. आणि यात मुंबई महानगराचा समावेश आहे. त्यामुळे महायुती आणि मविआ दोघेही संपूर्ण जोर लावणार. शिवाजी पार्कातील तोफा जास्त धडाडणार की बीकेसीतल्या याकडे सा-या राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT