Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024: शर्मिला ठाकरे मातेसमान, आशीर्वाद घ्यायला नक्की जाणार; मनसेचा उल्लेख करत वसंत मोरे म्हणाले...

Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांनी आजही आपली निष्ठा राज ठाकरेंसोबत असल्याचं दाखवून दिलं आहे. शर्मिला ठाकरे या मला मातोश्री समान आहेत. त्यामुळे पुण्यात निवडून आल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की जाणार असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Vasant More/Pune Lok Sabha

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज ठाकरेंसोबत त्यांचं पुन्हा जमेल की नाही अशी चर्चा होती. दरम्यान वसंत मोरे यांनी आजही आपली निष्ठा राज ठाकरेंसोबत असल्याचं दाखवून दिलं आहे. शर्मिला ठाकरे या मला मातोश्री समान आहेत. त्यामुळे पुण्यात निवडून आल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की जाणार असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीतून पुणे लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसे पक्ष सोडल्यानंतर माझ्या विचारांशी मी ठाम आहे. रात्री उशिरा मी राज ठाकरेंची सभा पाहिली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर पक्षांचा विचार सोडला. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे 4 जूनला समजेलच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रवींद्र धनगेकरांनी काम केलं असेल तर लोक त्यांना मतदान करतील. विकास करणे अशक्य कुठेच नसतं. या शहराचा जेव्हा खासदार होईन तेव्हा संपूर्ण शहराचा विकास करेन. त्यासाठी सहाही विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे भाजपने पुणेकरांना गृहीत धरणं बंद करावं, असा टोला लगावला आहे.

राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही. कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचं चारशे पारचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. निवडणुकीसंदर्भातला माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. निवडून आलो तर पुणे शहरात आघाडी घेणार. पुणे शहरात ट्राफिक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाही.पुणे शहरात सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीचा, पाण्याचा, कचऱ्याचा आहे. शहराचा विकासाची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिल्लीला जाणार आहे. निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT