Prakash Ambedkar : राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित : प्रकाश आंबेडकर

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की मुंबईमधील पूर्ण गणित बदलते. त्यासाठी आम्ही थांबलो होतो.
prakash ambedkar statement on raj thackeray support to mahayuti lok sabha election 2024
prakash ambedkar statement on raj thackeray support to mahayuti lok sabha election 2024saam tv
Published On

- अक्षय गवळी

Akola :

मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी भाजप (bjp) आणि मोदींना (pm modi) पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (vanchit bahujan aghadi president prakash ambedkar) यांनी नमूद केले. ॲड. आंबेडकर हे अकोला येथे पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला.बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.

prakash ambedkar statement on raj thackeray support to mahayuti lok sabha election 2024
Palghar Gramsevak Strike : ग्रामसेवक गेले सामूहिक रजेवर, पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

सांगलीत सेनेचे काहीच नव्हतं

सांगलीचे राजकारण तापलेले असताना आंबेडकर म्हणाले सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली.

मुंबईचा उमेदवार जाणीवपूर्वक जाहीर केला नाही

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की मुंबईमधील पूर्ण गणित बदलते. त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत असे विधान केले होते. यावर उत्तर देताना आंबेडकर यांनी निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये.

आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत असा इशारा देखील त्यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

prakash ambedkar statement on raj thackeray support to mahayuti lok sabha election 2024
Satara Constituency: उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे आव्हान कसं पेलणार? शशिकांत शिंदेंनी हसत हसतच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com