Palghar Gramsevak Strike : ग्रामसेवक गेले सामूहिक रजेवर, पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

Palghar Latest Marathi News : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांविरोधात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाभर आंदोलन सुरू आहे.
473 gramsevak on strike in palghar
473 gramsevak on strike in palghar saam tv

Palghar :

जल जीवन मिशन आणि श्रमजीवी संघटनेच्या वादात अडकलेल्या पालघर जिल्ह्यातील तब्बल ४७३ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आजपासून (बुधवार) सामूहिक रजेवर गेले आहेत. यामुळे ग्रामपंचायतचा कारभारावर परिणाम झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांविरोधात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. यात ग्रामसेवकांना नाहक भरडला जात असल्याचा आरोप करत ग्रामसेवकांकडून सामूहिक रजेचा इशारा देण्यात आला होता.

473 gramsevak on strike in palghar
Pune To Goa Flight : उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुण्याहून खास गाेव्यासाठी विमानसेवा, जाणून घ्या फ्लाईटची वेळ व दिवस

जिल्हा परिषदेने याच्यावर कोणताही तोडगा न काढल्याने अखेर आजपासून जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता ग्रामपंचायत मधील दाखल्यांसाठी काही दिवस खेटे मारावे लागतील. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

473 gramsevak on strike in palghar
Chhattisgarh Bus Accident News : 40 प्रवाशांसह नागपूरला निघालेल्या बसला साकोलीनजीक अपघात, छत्तीसगडचे प्रवासी जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com