Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जातंय, १३ तारखेनंतर सगळा हिशेब करू; निलेश लंकेंनी भरला दम

Lok Sabha Election 2024 : आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जात आहे. एखाद्या कार्यकर्त्यांसोबत हॉटेलमध्ये बसलं तरी रेड पडते. या सगळ्याचा येत्या १३ तारखेला हिशेब करू, असा सज्जड दम अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भरला आहे.

Sandeep Gawade

आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जात आहे. एखाद्या कार्यकर्त्यांसोबत हॉटेलमध्ये बसलं तरी रेड पडते. या सगळ्याचा येत्या १३ तारखेला हिशेब करू, असा सज्जड दम अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भरला आहे. पोलिसांच्या भूमिकेर भर सभेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरमधील भर सभेत त्यांनी हा आरोप केला आहे.

कार्यकर्त्यांकडे काही रक्कम सापडली म्हणून ६ वाजल्यापासून पोलीस ठाण्यात ठेवलंय. त्या पीआयला सांगा, दहा मिनिटांत तिथे तुमचा बाप येतोय म्हणून!, असं निलेश लंकेनी जाहीर सभेत वक्तव्य करून थेट पोलिसांनी अंगावर घेतलंय. नीलेश लंकेंचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, त्यातून राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाल आहे.

केंद्रीय सरकारी यंत्रणाचा वापर करून आणि विरोधकांवर कारवाया करून सरकारमध्ये बदल घडवला जात आहे. विरोधक जरा विरोधात बोलले की त्यांना जेलमध्ये टाकलं जातय किंवा पक्षात तरी घेतलं जातयं. ही कोणती पद्धत आहे. आता राज्यातही देखील हाच प्रकार सुरू झाला आहे. पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेचा वापर केला जात आहे. नगरमधील एका हॉटेलवर मीडियाचे लोक होते. त्य ठिकाणी वकीड मंडळीही होती. त्यांच्याकडे 50 ते 60 हजार रुपये सापडले. इतके पैसे आता कोणाकडेही असतात मात्र लगेचच पोलिसांनी त्यांना सहा वाजल्यापासून ताब्यात ठेवल आहे,अंस निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस; वसमतमध्ये अनेक गावात शिरले पुराचे पाणी, बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

SCROLL FOR NEXT