Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : नरेंद्र मोदी-राज ठाकरे येणार एकाच मंचावर? शिंदे, फडणवीस, अजितदादांसाठी घेणार सभा?

Lok Sabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार की नाहीत यावरून संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता हा संभ्रम दूर झाला आहे. आपण महायुतीच्या प्रचारात सहभाग घेऊ, प्रचारासाठी विचार केल्यास आपली भूमिका सकारात्मक आहे असं राज ठाकरेंनी म्हंटलंय.

Sandeep Gawade

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार की नाहीत यावरून संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता हा संभ्रम दूर झाला आहे. आपण महायुतीच्या प्रचारात सहभाग घेऊ, प्रचारासाठी विचार केल्यास आपली भूमिका सकारात्मक आहे असं राज ठाकरेंनी म्हंटलंय. मात्र सभांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेल नाही, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रचार करण्याबाबत सकारात्मक असल्याचंही राज ठाकरे म्हटलंय.

दरम्यान मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंकडून घुमजावचं राजकारण केलं जात असल्याची टीका केली जातेय.. यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातही चांगलीच जुंपलीय. दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंना अशी कोणती फाईल दाखवली असा सवाल संजय राऊतांनी केला होता. यावर राज ठाकरेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळेच मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केला.. मात्र आपण मोदींना पाठिंबा का दिला हे राज ठाकरेंनी पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार हे निश्चित झालंय. 20 मेला मुंबईत लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी 17 मे रोजी शिवाजी पार्कात मनसेची महायुतीसाठी भव्य सभा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता महायुतीच्या सभांच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच स्टेजवर येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT