Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा पार पडली. मात्र या सभेत गाजला तो कांदाप्रश्न आणि त्यात तरुणानं घातलेला गोंधळ. त्यामुळे आता राजकारणही रंगू लागलंय, त्यामुळे हा कांदा कुणाला रडवणार हेच पाहायचं.

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा पार पडली. मात्र या सभेत गाजला तो कांदाप्रश्न आणि त्यात तरुणानं घातलेला गोंधळ. त्यामुळे आता राजकारणही रंगू लागलंय, त्यामुळे हा कांदा कुणाला रडवणार हेच पाहायचं. राज्यात लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकच्या समावेश असल्यामुळे प्रचारात कांद्याचा मुद्या चांगलाच गायतोय. पिंपळगावमध्ये मोदींनी घेतलेल्या सभेत याची झलक पाहायला मिळाली. मोदींची सभा सुरू असताना भाषणादरम्यान एका तरुणाने अचानक कांद्यावरून घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या तरुणानं कांद्यावर बोलण्याचा आग्रह धरला असताना मोदींनी जय श्रीरामचा नारा दिला, त्यामुळे सभेतलं वातावरण चांगलंच तापलं.

पोलिसांनी धावाधाव करत किरण सानप नावाच्या या तरुणाला सभेतून बाहेर काढत त्याला ताब्यात घेतलं. हा तरुण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार यांनी अप्रत्यक्षपणे पवार गटाकडे बोट दाखवलंय.

भारती पवारांनी अप्रत्यक्ष टीका केली असली तरी पवारांनी मात्र जाहीरपणे किरण सानप य़ा तरुणाचं समर्थन केलंय. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. हा तरुण जर आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमानच आहे अशी जाहीर भूमिका पवारांनी घेतलीय.

ऐन लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या निर्यातबंदीवरून राजकारण तापलं आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यात शुल्क भरमसाठ असल्यामुळे ही अघोषित निर्यातबंदीच असल्याचा आरोप शेतक-यांचा आहे. त्यामुळे कांदा नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात कांद्याच्या प्रश्न महायुतीची डोकेदुखी वाढवणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT