Surabhi Jayashree Jagdish
मेकअप न करता भुवया नीट, दाट आणि आकर्षक दिसाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. रोज पेन्सिल, जेल किंवा पावडर न वापरता सुद्धा योग्य काळजी घेतली, तर भुवयांचा लूक खुलून दिसू शकतो.
दररोजच्या सवयी आणि घरगुती उपायांनी भुवया व्यवस्थित सेट राहतात. यामुळे चेहऱ्याला छान वेगळा लूक मिळतो. खाली दिलेले उपाय नियमित केल्यास मेकअपशिवायही भुवया सुंदर दिसू लागतात.
दररोज सकाळी किंवा रात्री स्वच्छ ब्रशने भुवया हलक्या हाताने सेट करा. यामुळे केस नीट एका दिशेने बसतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारून केस मजबूत होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी बोटांच्या टोकाने भुवयांना नारळ तेल लावा. तेलामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.नियमित वापर केल्यास भुवया नैसर्गिकरीत्या दाट दिसू लागतात.
आठवड्यातून ३–४ वेळा कॅस्टर ऑइल भुवयांवर लावा. हे तेल केसांच्या वाढीस मदत करतं आणि गळती कमी करतं. भुवयांना नैसर्गिक दाटपणा येतो, मेकअपची गरज कमी भासते.
भुवयांचे शेप देताना जास्त केस काढण्याची सवय टाळा. खूप पातळ भुवया मेकअपशिवाय उठून दिसत नाहीत. नैसर्गिक जाडी राखली तर चेहरा अधिक छान दिसतो.
ताजा कोरफडीचा जेल भुवयांवर हलक्या हाताने लावा. यामुळे केसांना पोषण मिळतं आणि ते सेट राहतात. जेल सुकल्यावर भुवया नैसर्गिकरित्या नीट दिसतात.
प्रथिने, बायोटिन आणि व्हिटॅमिन ईयुक्त आहार घ्या. याचा थेट परिणाम भुवयांवर होतो. चांगल्या आहारामुळे भुवया आपोआपच दाट व मजबूत दिसतात.