Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : इंडिया आघाडीतील कोणाला पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्न?; एकनाथ शिंदेंनी नाव घेत शिवतीर्थावरून केली सडकून टीका

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत, मात्र फेसबुक लाईव्ह करून पंतप्रधान होता येत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Sandeep Gawade

बाळासाहेब ठाकरे यांनीकाँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसवर ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे. मात्र आज उद्धव ठाकरे त्यांच्या गळ्या गळा घालून बसले आहे. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत, मात्र फेसबुक लाईव्ह करून पंतप्रधान होता येत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. कोरोना महामारित लोकांचे जीव जात होते आणि हे घरी बसून कोमट पाणी पीत होतं, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. एनडीएची आज नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर सभा होत सुरू आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आण रामदास आठवले यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांचे नेते उपस्थित आहेत.

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अखेरच्या टप्प्यात शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केला.

उद्धव ठाकरेंच्या प्रचारात बाळासाहेबांचे फोटो आणि त्याखाली कॉंग्रेसचा पंजा आहे. दहा वर्षात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला का? होणारही नाही. पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. ज्यांनी मुंबई वाचविण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे जात असल्याची टीका त्यांनी केली.

नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित ठेवला, गरीबांचं कल्याण केलं आणि भ्रष्टाचार थांबवला. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. 80 कोटी जनतेला मोफत रेशन दिलं. जनतेला पाच लाखांचा आरोग्य विमा दिला. देशाला आत्मनिर्भर केलं. नरेंद्र मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत. देशाचा ऐतिहासिक वारसा जपत आहेत. बाबासाहेबांचं संविधान जपण्याचं काम मोदींनी केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT