Prakash Ambedkar On OBC Saam Digital
लोकसभा २०२४

Loksabha Election: लोकसभेच्या रणांगणात वंचित फॅक्टर फ्लॉप! 'मविआ'शी मैत्री तोडून प्रकाश आंबेडकरांनी काय मिळवलं?

Maharashtra Loksabha Election: गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरलेल्या वंचित आघाडीचा फॅक्टर या निवडणुकीत मात्र सुपर फ्लॉप ठरल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या मैदानात प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला एकट्याने लढण्याचा निर्णय चांगलाच फसल्याची चर्चा आहे.

Gangappa Pujari

महाविकास आघाडीची ऑफर नाकारुन एकला चलो रेची भूमिका घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यातील लोकसभा निवडणुकीत सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनाही अकोल्यामध्ये पराभवाची धुळ चाखावी लागली. त्यामुळे मविआची साथ सोडून वंचित आघाडीने काय मिळवलं? हे न उलघडणारे कोडे आहे.

राज्यात वंचितचा फ्लॉप शो..

राज्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या सहभागाची चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीने वंचितला ५ ते सहा जागांची ऑफरही दिल्याची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीसोबतची मैत्री तोडून प्रकाश आंबेडकर यांनी 'एकला चलो' चा नारा दिला. मतदाराला त्यांची ही भूमिका पटली नसल्याचे मिळालेल्या मतदानातून दिसत आहे.

एकट्याने लढण्याची भूमिका चुकली?

लोकसभेत वंंचित आघाडीने ३५ उमेदवार उभे केले होते. तसेच त्यांनी कोल्हापुरमध्ये शाहू महाराज, सांगलीत विशाल पाटील, बारामतीत सुप्रिया सुळे आणि नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र दिसले.

३५ उमेदवार पराभूत

स्वत: प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यामध्ये पराभव स्विकारावा लागला असून त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालीत. तसेच वंचितच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांना दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राज्यात केंद्र सरकारविरोधी लाट असताना प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली वेगळी भूमिका फसल्याचे दिसत आहे. जनतेचा सरकारविरोधात असलेला संकेत पाहून मविआसोबत गेले असते तर कदाचित आंबेडकरांच्या वंचितला काही जागा मिळण्याची शक्यता होती, असा अंदाज लावला जात आहे.

मतदानाचा टक्काही घटला

दरम्यान, गेल्या लोकसभेसह विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत वंचितच्या मतदानाचा टक्काही घसरल्याचे पाहायला मिळाले. गेल्यावेळी वंचितला राज्यात तब्बल 42 लाख मतं मिळाली होती. वंचितच्या उमेदवारांमुळे ७ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत व्हावं लागले होते. 2019च्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी वंचित फॅक्टर मविआसाठी धोक्याचा ठरेल असं वाटत होते.मात्र मतदारांनी वंचितला स्पष्टपणे नाकारले.

प्रकाश आंबेडकर, वसंत मोरेही पिछाडीवर

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर अकोल्यात तिस-या नंबरवर फेकले गेले. पुण्यात तर वसंत मोरेंना केवळ 25 हजार मतांवर समाधान मानावं लागले. तर परभणीतून पंजाबराव डख यांना तर 50 हजार मतांचीही मजल मारता आलेली नाही. तसेच मुंबई उत्तरमधून वंचितच्या उमेदवाराला 1429 मते, मुंबई उत्तर मध्यमधून 3600 मते, मुंबई उत्तर पूर्वमधून 2665, उत्तर पश्चिममधून 5962 मते, मुंबई दक्षिण मधून केवळ 994 मते, दक्षिण मध्य मुंबईतून 7342 मते मिळाली आहेत. त्यामुळे मविआसोबतची मैत्री तोडल्यानेच वंचित फॅक्टर फ्लॉप ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT