Supriya Sule Vs Sunetra Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election Result: सर्वात मोठी अपडेट! राज्यातील टॉप ५ लढतीत कोण पुढे? कोण मागे? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra lok sabha nivadnuk nikal 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या टॉप ५ लढतीत कोणी आघाडी घेतली? कोण पिछाडीवर आहे? जाणून घ्या एका क्लिकवर.

Gangappa Pujari

राज्यातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक फेरीत बदलणारी स्थिती, आघाडी पिछाडीचा खेळ अन् क्षणात फिरणाऱ्या आकड्यांमुळे कार्यकर्त्यांसह, उमेदवारांचीही धाकधुक वाढत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकांचा पहिला कल समोर आला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती, सातारा, माढा, सांगली, शिरुर या महत्वाच्या मतदार संघात कोणी आघाडी घेतली? कोण पिछाडीवर आहे? जाणून घ्या सविस्तर...

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे यांनी जोरदार आघाडी घेतली होती. मात्र शिवतारेंच्या पुरंदर विधानसभेतील मतमोजणीत सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळे आघाडीवर आल्याचे दिसत आहे.

शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतल्याचे कल समोर आले आहेत. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना जोरदार टक्कर दिली असून पोस्टल मतदानासह तिस-या फे-यांमध्ये ते आघाडीवर आहेत.

साताऱ्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना जोरदार टक्कर देत आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये शशिकांत शिंदे हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

सांगलीच्या तिरंगी लढतीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. विशाल पाटील यांनी सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली असून महायुतीचे संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

अशीच स्थिती माढ्यातही पाहायला मिळत आहे. माढा लोकसभा मतदार संघात शरद पवारांचे शिलेदार धैर्यशिल मोहिते पाटील यांची तुतारी जोरदार वाजताना दिसत आहे. धैर्यशिल मोहिते पाटील यांनी सुरूवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT