Raj Thackeray And Devendra Fadnavis Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha Result: मनसेच्या 'बिनशर्त' पाठिंब्याने महायुतीला तारलं! राज ठाकरेंनी सभा घेतलेले उमेदवार आघाडीवर

Maharashtra Loksabha Election Result: राज्यात महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभांनी महायुतीला तारल्याचे चित्र दिसत आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई| ४ जून २०२४

आज १८ व्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसत असून महाविकास आघाडीने तब्बल ३० जागांवर आघाडी घेतली आहे. एकीकडे भाजप, शिंदे गटाचे दिग्गज नेते पिछाडीवर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिब्यांने तारल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीची जोरदार पिछेहाट पाहायला मिळत असून महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांनी मात्र महायुतीला दिलासा दिला आहे. ज्या- ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा झाल्या, त्याठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे तसेच कल्याण डोंबिवली आणि पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. याचठिकाणी म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे, ठाण्यातून नरेश मस्के, कल्याण-डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे तर पुण्यातून मुरलीधर मोहळ हे आघाडीवर आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जोर का झटका दिला आहे. तर रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांनी राजन विचारेंना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT