Maharashtra Election Mahayuti  google
लोकसभा २०२४

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Maharashtra Election: दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर व उत्तर पश्चिम शिवसेनाच लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेचे असल्याने उर्वरित ५ ही जागा शिवसेना लढवणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Election Mahayuti :

राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीचा अडलेला तिढा सुटल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर व उत्तर पश्चिम या जागांचा तिढा सुटला असून या ५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेचे असल्याने उर्वरित ५ ही जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या ५ जागांचा तिढा सुटला असला तरी नाशिकचा तिढा अजून कायम आहे.

उबाठाचे अमोल किर्तीकर यांच्याविरोधात शिवसनेचे रविंद्र वायकर यांचे नाव जवळपास निश्चित असून आज यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. रविंद्र वायकर यांच्या नावाची घोषणा झाल्यास उद्याच फॉर्म भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर पालघरमधून राजेंद्र गावितच महायुतीचे उमेदवार असणार आहे. मात्र ठाणे व नाशिकच्या जागेवरून पेच कायम आहे. मात्र या दोन्ही जागांवर शिवसेनाच लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. ठाण्यात प्रताप सरनाई आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात सरनाईक याचं पारडं जड असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमध्ये अजूनही सस्पेन्स कायम

आज शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हेमंत गोडसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाहीये. अजून अधिकृतरित्या उमेदवार घोषित झाला नसल्याचं गोडसे म्हणालेत. नाशिकच्या लोकसभेसाठी महायुतीचा तिढा अडलाय. नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे नेतेही इच्छुक आहेत. जागेवरून महायुतीचा निर्णय होत नसल्याने छगन भुजबळांनी कोपरखळी मारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT