Bachchu kadu 
लोकसभा २०२४

Maharashtra Election: ..जर माझा फोटो वापरला असेल तर .. ; फोटोवरून प्रहारचा महाविकास आघाडीला सज्जड दम

Bachchu kadu : महाविकास आघाडीने प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा फोटो वापरला होता. पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात आहे, त्यावरून बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला इशारा दिलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे , अकोला

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला सज्जड दम दिलाय. फोटो वापरल्यावरून प्रहारचे प्रमुख बच्चू कडू महाविकास आघाडीला इशारा दिलाय. जर महाविकास आघाडीने फोटो वापरला असेल तर त्यांच्यावर कारवाई केला जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.(Latest News)

महाविकास आघाडीने प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा फोटो वापरला होता. पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात आहे, त्यावरून बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला इशारा दिलाय. फोटो वापरण्याच्या पार्श्वभूमीवरून बच्चू कडू म्हणाले की आमचा कार्यकर्त्यांनी बैठक घेतली होती. महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायच्या मानसिकतेत आहे, मात्र मी त्यांना सांगितलं की कुठलाही पाठिंबा देऊ नये.

महाविकास आघाडीने जर फोटो वापरला असेल तर आम्ही शहानिशा करू. त्याबाबत त्यांना पत्र देऊन कारवाई करू असं बच्चू कडू म्हणालेत. आमच्याकडे पाठिंबासाठीचा प्रस्ताव आला होता, मात्र आम्ही कोणताही निर्णय घेतला नाहीये. कुठेही पाठिंबा नाही जे काही भूमिका कार्यकर्त्यांची असेल त्या स्तरावर त्यांनी घ्यावी, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.

आज सकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने खासदार नवनीत राणा यांचा मुख्य प्रचार कार्यालयाचा मंडप उडाला त्यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले, ही तर हनुमान जींची विटंबना झाली. हनुमान चालीसा रस्त्यावर म्हणण्याचे दिवस आले. ज्या बाळासाहेबांनी अख्या देशाला हिंदू सांगितलं त्यांचे फोटो आता ते लावत आहे. ज्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला तो अमान झाला.

आता हनुमान जींने आज त्यांनाच प्रसाद दिला आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान बच्चू कडू हे अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. अकोल्यातील प्रहारचे कार्यकर्ते महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत होते. त्यापार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी पदाधिका-यांची बैठक घेत कोणालाच पाठिंबा न देण्याच्या सूचना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT