Uddhav Thackeray Sabha Amravati:  Saamtv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या ही मोदी गॅरंटी.. नवनीत राणांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंनी डागली तोफ!

Uddhav Thackeray Sabha Amravati: आज उद्धव ठाकरे हे राणा दांपत्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २२ एप्रिल २०२४

राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुती आणि महाविकास आघाडीतील दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे हे राणा दांपत्यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यावेळी झालेल्या जाहीर सभेतून त्यांनी मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"पूर्ण राज्यात देशात मोदीविरोधी लाट दिसते. आचार संहितेवेळी काळजी वाहू प्रधानमंत्री त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत. जोपर्यंत प्रधानमंत्री शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये होते तेव्हा किती वेळा महाराष्ट्रात आले होते. आता गल्लीबोळामध्ये जात आहेत," असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी लगावला.

सांस्कृतिक मंत्र्यांवर काय संस्कार?

तसेच "ते आधी बोलले होते की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती वाटत आहे. मग तुम्ही कमी मुलं होणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही? आम्ही महिलांवर बोललो तो महिलांचा अपमान होतो. मग सुधीर मुनगंटीवार हे बहीण भावाच्या नात्यावर बोलले. त्या सांस्कृतिक मंत्र्यावर काय संस्कार केले?" असा सवालही ठाकरेंनी यावेळी विचारला.

लोकशाही विरुद्ध हुकुमशाही लढाई...

"मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नाही. काँग्रेसच्या खिशात असलेले पैसे फ्रिज केले, काँग्रेसच्या खाली पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातील पैसे काढा मग कोणी लुटलं ते पहा. भ्रष्टाचार करा आणि भाजपात या ही मोदीची गॅरंटी आहे, ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही लढाई आहे," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT