Sharad Pawar, Prithviraj Chavan, |Satara Loksabha News saam tv
लोकसभा २०२४

Satara Loksabha News: शरद पवारांकडून प्रस्ताव आला तर... सातारा लोकसभा लढवण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले!

Maharashtra Politics News: साताऱ्यातून काँग्रेसच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले आहे.

ओंकार राजेंद्र कदम

Satara Loksabha Constituency News:

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेचे पाच उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. मात्र सातारा लोकसभेसाठी अद्याप कोणताही उमेदवार देण्यात आला असून ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसच्या तिकिटावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले आहे. (Maharashtra loksabha Election 2024)

सातारा लोकसभा काँग्रेसकडे जाणार?

सातारा लोकसभा मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा दिला आहे. "हा मतदासंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. 48 पैकी जवळजवळ सर्व जागांवर एकमत झालं आहे. सातारा मतदार संघात उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा सुरू आहे, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे, " असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

"उमेदवार कोण असेल हा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने मागे उभे राहू असं सांगितलं आहे. हा मतदासंघ हा 'तुतारी' चा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा. सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून प्रस्ताव अजून आला नाही जर आला तर त्या प्रस्तावाचा विचार करू, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे," असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागा वाटपात काँग्रेस आणि शरद पवार गटात तडजोड होणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या शरद पवार गटाकडे असलेली साताऱ्याची जागा काँग्रेसला देऊन त्याबदल्यात भिवंडीची जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा शरद पवार गटाकडेच राहिल्यास उमेदवारीसाठी बाळासाहेब पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT