Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Jayant Patil Speech: दिवस बिघडायला लागले; बॅलन्स जायला लागला... जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Maharashtra loksabha Election: पुण्यामध्ये महाविकास आघाडीची विराट सभा झाली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. १८ एप्रिल २०२४

आज पुण्यामध्ये महाविकास आघाडीसह, महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, पुण्याचे रविंद्र धंगेकर तसेच अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यामध्ये महाविकास आघाडीची विराट सभा झाली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले जयंत पाटील?

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार ठरवताना कोणता विचार नाही. उमेदवार बदला जातोय, काही उमेदवार आज ठरलेत. अनेक ठिकाणी उमेदवार नाहीत. त्यामुळे या देशाची व्यवस्था बदलायची असेल तर आपले जनतेचे राज्य पुन्हा आणावे लागेल, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

धंगेकर पुन्हा दंगा करणार..

तसेच "रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) विधानसभेला चमत्कार केला. आता त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आता लोकसभेतही धंगेकर दंगा केल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्यांना जागा दाखवतील," असा विश्वासही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी व्यक्त केला.

अजित पवारांना टोला..

"संसदेत सगळ्या प्रश्नांवर बोलणारा आमचा उमेदवार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे व सुळे ताई यांना संसदरत्न मिळाला आहे. आता संसदरत्न पुरस्कार किती महत्वाचा नाही, हे सांगायला विरोधकांची ताकद जायला लागली. पैसे घेऊन संसदरत्न पुरस्कार मिळत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे संसदेत कधी गेले नाहीत. त्यांनी संसदरत्नांची मापं काढणे शोभतं नाही," असा थेट टोला अजित पवार यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

Gold Price Today: सोन्याच्या दरात आठवडाभरात सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

Bollywood Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री ४० व्या वर्षी झाली आई, गणेशोत्सवात घरी आली लक्ष्मी

Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना भयंकर घडलं! पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप-लेक बुडाले

Poor blood circulation in legs: शरीरात रक्ताभिसरण कमी झाल्याची पायात दिसणारी 5 चिन्हं

SCROLL FOR NEXT