Loksabha Election: मविआ आणि महायुतीचं आज जोरदार शक्तिप्रदर्शन! पुणे, बारामतीसह हायहोल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल

Maharashtra Politics Latest News: बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह रविंद्र धंगेकर तसेच अमोल कोल्हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Maharashtra Lok Sabha Election News :
Maharashtra Lok Sabha Election News : Saam tv

अक्षय बडवे, पुणे|ता. १८ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज महाविकास आघाडी आणि महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार असून राज्याचे लक्ष लागलेल्या हायहोल्टेज जागांवर आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यामध्ये बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह रविंद्र धंगेकर तसेच अमोल कोल्हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज भरणार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) रविंद्र धंगेकर, शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे आणि बारामतीसाठी सुप्रिया सुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्याच्या कॅम्प परिसरात महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election News :
Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा वंचितमध्ये प्रवेश

त्याचबरोबर आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जाणार असून महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्यातील ब्लू नाईल हॉटेल जवळ महायुतीची सभा पार पडणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election News :
Maharashatra Election: धाराशिवमध्ये दीरविरुद्ध भावजयचा सामना; मात्र दोन्हांची उमेदवारी अडचणीत, काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com