Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यासोबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sandeep Gawade

अक्षय गवळी

Maharashtra Lok Sabha Election

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येण्यासोबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ दोन जांगावर पाठिंबा हवा आहे. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार असल्याने नाना पटोलेंना प्रचंड दुःख झालं आहे, यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उद्या आमच्या पाठिंबामुळे कोण जिंकणार तो भाग वेगळा असणार. पण आजच्या पत्रकार परिषदेतून सांगतोय नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार, याचं प्रचंड दुःख झालं आहे. म्हणून त्यांनी आरोप केला की वंचितनं म्हणजेच 'आम्ही' जो पाठिंबा दिला तो गडकरींना हरविण्यासाठी दिला. दरम्यान नाना पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेला संबंध यातून उघड झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी का माघार घेतली. हे आता समोर येतंय. कारण त्यांना भाजपसोबत लढायचं नव्हतं. दरम्यान काँग्रेसमधल्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांचे छुपे संबंध भाजपच्या नेत्यांशी आहेत. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याच दुःख त्यांना होतंय.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गंभीर्याने पाहावं

दरम्यान काँग्रेसमध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे स्पष्ट झालं. नाना फोटो आणि भाजपच्या नेत्यांशी असलेलं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे. तसेच वंचितला मविआत का घेऊ नये? वारंवार नाना पटोलेंकडून व्यक्तव्य होतं होतं. आता त्यावरून स्पष्ट होतंय वंचितनं महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असता, तर भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला असता. तेच नाना पटोलेंना नको होतं. त्यामुळे वंचितला बाहेर ठेवण्यात आलं. असा थेट आरोपी त्यांनी नाना पटोलेंवर केला आहे. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा भाजपच्या नेत्यांशी छुपा संबंध आहे, त्यामुळ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गंभीर्याने पाहावं असा आवाहनही आंबेडकरांनी केलं.

काँग्रेसच्या नांदेडच्या उमेदवाराला पाठिंबा नाही

दरम्यान आता मविआसोबत बोलणी थांबली आहे. काँग्रेसला दिलेल्या पत्रानुसार अधिक मतदारसंघासाठी पाठिंबा मागणी आली तर कदाचित देऊ. दिलेला शब्द पाळला जाणार असल्याचे आंबेडकर म्हटले. भाजपचा पराभव करणं हेच आमचे लक्ष आहे. आज नाना पटोले यांनी जे उमेदवार जाहीर केले. दुर्दैवाने बोलावे लागते नांदेडचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आठवड्यातून तीनदा डायलिसीसवर. ते फिरू शकत नाहीत. नांदेडमध्ये नाना पटोलेंची अशोक चव्हाणांसोबत मॅच फिक्सिंग. आमचा नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT