Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : 'यावेळी शिवसैनिकांनी ठरवलंय...'; शाहू महाराजांची गळाभेट घेत उद्धव ठाकरे म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रमुख घटक उद्धव ठाकरे यांनी आज शाहू महाराजांची कोल्हापूरमधील न्यू पॅलेसमध्ये भेट घेतली.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आज अखेर महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे प्रमुख घटक उद्धव ठाकरे यांनी आज शाहू महाराजांची कोल्हापूरमधील न्यू पॅलेसमध्ये भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची घेतलेली गळाभेटीची राज्यभर चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसैनिक पूर्ण ताकदीनीशी शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. प्रचाराला तर येणारच पण विजयाचा गुलाल उधळायलाही येणार, तसं वचन महाराजांना दिलं आहे. शाहू महाराज आणि ठाकरे घराण्याचे संबंध पर्वापार आहेत, यापुढेही ते घनिष्ठ राहतील,असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी स्वतः श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, युवराज मालोजीराजे, मधुरीमा राजे उपस्थित होत्या मात्र या भेटीदरम्यान माजी खासदार संभाजी राजे अनुपस्थित होते. संभाजी राजे यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडे विचारणा केली असता संभाजीराजे नियोजित दौऱ्यासाठी राधानगरी परिसरात कार्यकर्ता मेळाव्याला गेल्याचे समजलं.

राज्यसभेवेळी माजी खासदार संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी संभाजी राजे यांना शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास संदर्भात विनंती देखील केली होती. मात्र आपण कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेणार नसल्याची भूमिका संभाजी राजे यांनी मांडली होती. आज स्वतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरातील न्यू पॅलेस मध्ये दाखल झाले असतानाच संभाजी राजे यांच्या अनुपस्थितीवरून अनेकांनी भुवया उंचावल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

Allu Arjun: AA22xA6 मध्ये पुष्पाचा नवा अंदाज; साऊथ चित्रपटात झळकणार हॉलिवूडचा व्हिलन

SCROLL FOR NEXT