Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : ...तर प्रकाश आंबेडकरांचा विजय निश्चित; 'मविआ'तील नेत्यांचं मोठ्या पक्षाला अकोल्यातून उमेदवारी न देण्याचं आवाहन

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अद्यपा महाविकास आघीडीसोबत जाण्याचा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दरम्यान अकोल्याच्या जागेसंदर्भात दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अद्यपा महाविकास आघीडीसोबत जाण्याचा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. दरम्यान अकोल्याच्या जागेसंदर्भात दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी, अकोला लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष MVA सोबत आला नाही तर आंबेडकर यांना पाठिंबा देण्यावर विचार करावा. काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात असा विश्वास काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

उद्वव ठाकरेंविरोधात नारजीचा सूर

उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षांना विचारात न घेता महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जाहीर केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं वृत्त आहे. दक्षिण मध्य मुंबई आणि सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. उद्धव ठाकरे यांनी मेरीटवर उमेदवार जाहीर करायला हवे होते, असं मत एका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांने व्यक्त केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आधी मविआतील वाद मिटवा-प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज नागूपर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत समझोता नाही हे आम्ही सांगतो होतो. ते आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर होत नाही. या तिन्ही पक्षांच्या वेगळवेगळ्या याद्या बाहेर पडताना दिसत आहेत. ते मैत्रीपूर्ण अशा पद्धतीची संकल्पना मांडत आहेत. आम्हाला हे अगोदर माहीत होतं. यामुळे आम्ही त्यांना पहिलं तुम्हीच वाद मिटवा म्हटलं'.

'महाविकास आघाडीचं भांडण मिटत नसल्यामुळे ते आम्हाला कोणत्या जागा लढायला पाहिजे, ते सांगत नाही. आम्ही महाविकास आघाडीत गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता. आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पाठिंबा देत असल्याचा त्यांना सांगितलं, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.'लोकसभा निवडणुकीत एकाच विचारांची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. 14 ते 16 मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी मागील काळात पक्ष लढलेले आहे. त्यांचं त्याच ठिकाणी अस्तित्व आहे. जिथे लढलेली नाही, तिथे त्यांचं अस्तित्व नाही. शिवसेना आणि भाजपमधून दिसले आहे. भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या लोकांना घेण्याची गरज काय, खरंतर त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती आहे, असेही पुढे त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT