Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढणार का? शंभूराज देसाई यांच्या भेटीत काय ठरलं? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : आज मंत्री शंभूराजे देसाई यांनी विजय शिवतारे उपाचार घेत असलेल्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवू नये अशी विनंती करण्यात येते असल्याची चर्चा आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. बारामतीतून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मंत्री शंभूराजे देसाई यांनी विजय शिवतारे उपाचार घेत असलेल्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवू नये अशी विनंती करण्यात येते असल्याची चर्चा आहे. (Latest Marathi News)

विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नुकताच आनंद परांजपे यांनी विजय शिवतारे यांना आवर घालण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं होतं. नाहीत कल्याण मतदारसंघात वेगळा निकाल लागू शकतो असा इशाराही दिला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत शिंदे गटाने विजय शिवतारे यांना समज देखील दिली होती. मात्र, तरी देखील शिवतारे बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम होते. दरम्यान, शिवतारे यांनी बुधवारी सासवडमध्ये तातडीने आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या बैठकीत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली.

जवळपास दोन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत विजय शिवतारे यांना बारामतीतून अपक्ष उभे करण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT