Loksabha Election: माढा मतदारसंघात काका- पुतण्यात संघर्ष! महादेव जानकरांची डोकेदुखी वाढणार; स्वरुप जानकर आव्हान देणार?

Mahadev Jankar Vs Swarup Jankar: तुम्ही परभणीतून लढा किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढा आमची काही हरकत नाही. पण तुम्ही माढ्यातून लढायचा विचार करत असाल तर गंभीरपणे सुसंवाद करा, असा इशारा स्वरुप जानकर यांनी दिला आहे.
Mahadev Jankar Vs Swarup Jankar:
Mahadev Jankar Vs Swarup Jankar:Saamtv
Published On

सचिन जाधव, पुणे|ता. १६ मार्च २०२४

Madha Loksabha Election 2024:

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला अवघे काही तास उरलेत. त्यामुळेच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे रासपचे नेते महादेव जानकर हे महाविकास आघाडीतर्फे माढा लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत असतानाच महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर यांनीही काकांना आव्हान देत माढ्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणालेत स्वरुप जानकर?

"माननीय महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना चार दिवसांपुर्वी मी एक खुले पत्र लिहले होते. त्यांनी पुतण्या राजकारणात येणार नाही, या त्यांच्या वक्तव्याशी मी असहमती दर्शवली होती. मी राजकारणात येणार आणि प्रसंगी माढा लोकसभेची निवडणूक लढवणार,अशी भुमिका घेतली आहे. ती आज थो़ड्या विस्ताराने स्पष्ट करत आहे,"

"गेल्या ३० वर्षांत जानकर साहेबांनी कुटुंबियांशी कधीही सुसंवाद केला नसला तरी कुटुंबियांनी त्यांना शक्य ती साथ दिलेली आहे. गेल्या दहा वर्षापासून ते मुख्य राजकीय प्रवाहात आहेत. यादरम्यान, मी पुतण्या म्हणून आजवर कधी त्यांचे नावही सांगितलेले नाही. त्यांच्या नावाचा गैरवापर करायची गोष्ट तर फार लांबची बाब आहे, असे असताना जानकर साहेब वारंवार पुतण्या राजाकरणात येणार नाही असे सांगतात. ही बाब खटकणारी आहे," असे स्वरुप जानकर म्हणालेत.

Mahadev Jankar Vs Swarup Jankar:
Pimpari Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांचा धुमाकूळ, ७- ८ वाहनांची तोडफोड केल्याने खळबळ

२०१४ पुर्वी त्यांनी केलेल्या राजकीय संघर्षाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पण सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मदत करण्याची भुमिका आमची असते, पण त्यांना ती मदतही नको आहे, असे दिसत आहे. त्यामुळे पुतण्या राजकारण करणार नाही, या त्यांच्या भुमिकेला विरोध करावा लागत आहे.

तुम्ही परभणीतून लढा किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढा आमची काही हरकत नाही. पण तुम्ही माढ्यातून लढायचा विचार करत असाल तर गंभीरपणे सुसंवाद करा. अन्यथा माढयात तुमचा पुतण्या तुमच्यासमोर असणार आहे, याची गंभीरपणे नोंद घ्या हे मला सांगायचे आहे.. असे थेट आव्हान स्वरुप जानकर यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

Mahadev Jankar Vs Swarup Jankar:
Maharashtra Politics: "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से"; भित्तीचित्र रंगवत गडकरींनी प्रचाराचा फोडला नारळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com