Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : बीडमधून लोकसभेसाठी कोणाला मिळणार संधी?; बजरंण सोनवणे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election : बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंण सोनवणे यांनी प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर उपेक्षेप्रमाणे त्यांनी आज शरद पावर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंण सोनवणे यांनी प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर उपेक्षेप्रमाणे त्यांनी आज शरद पावर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बीडमध्ये उमेदवारीची चर्चा शिगेला पोहचली असून राजकीय वातावरणही तापलं आहे.

बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी अनेक वर्ष आपल्या सोबत काम करत होते. मागच्या निवडणुकीत त्यांना संधी दिली,चांगली मत मिळाली. काही लहानसहान प्रसंगामुळे ते येत नव्हते,आम्ही आग्रह केला आणि आले. निवडणुका जाहीर झाल्या आहेत,अजून बीड बाबत एक महिना काम करण्यास वेळ आहे. अनेकांची इच्छा आहे लोकसभा लढवण्याची, अनेक जण भेटीगाठी येत आहेत. जयसिंगराव गायकवाड घरात न थांबता काम करत आहेत. मात्र पक्षाची वरिष्ठ बैठक होईल त्यात लोकसभेबाबत निर्णय होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षनिर्णय आम्हाला मान्य असेल असं सोनवणे यांनी सागितलं याचा आनंद आहे. अनेक लोक बीड मधील देशाच्या संसदेत गेले आहेत. बबनराव ढाकणे आता हयात नाहीत, नगर जिल्हातील पण बीडमध्ये गेले आणि निवडून आले. बीड जिल्ह्यात गेले आणि १९८० ला सगळे माझे आमदार निवडून दिले, असा आठवणींना उजाळाही त्यांनी यावेळी दिला.

काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीडमधील कार्यकर्त्यांची आठ-दहा दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यात कार्यकर्त्यांनी बऱ्याच शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं राजकारणात जो सन्मान आपल्याला पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. बीड जिल्ह्यातून मला 5 लाख पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलं. या नागरिकांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

SCROLL FOR NEXT